Food Dosti App to Avoid Wastage of Hotel Food

EENADU INDIA, NOVEMBER 24, 2017

Link to the original article

पुणे – हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये जेवण करताना अतिरिक्त शिल्लक असलेले अन्न वाया जाऊ नये, यासाठी एका आयटी इंजिनियरने ‘फुड दोस्ती’ हे फुड डोनेट अॅप तयार केले आहे. संजीव नेवे असे त्याचे नाव असून देशात पहिल्यांदाच अशाप्रकारे फुड डोनेट अॅप तयार करण्यात आले आहे. तर मग जाणून घेऊया या फुड दोस्ती अॅपबद्दल…

या अॅपच्या माध्यमातून फुडी व्यक्तींना त्यांचे शिल्लक असलेले अन्न हॉटेल मालकाकडे जमा ठेवून, पुन्हा ताज्या स्वरुपात खाण्याची संधी मिळत आहे. हॉटेल-रेस्टॉरंट चालकांना रेस्टॉरंटमध्ये शिल्लक असलेले अन्न शहरातील गरजू व्यक्तींना दान करण्याची सुविधादेखील या अॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हॉटेल आणि रेस्टॉरंट चालक आपल्याला सहसा हाफ प्लेट अन्न देत नाहीत. त्यामुळे खाण्याची इच्छा नसतानादेखील आपल्याला फुल प्लेट अन्न ऑर्डर करावे लागल्याने बहुतेकदा आपण ऑर्डर केलेले अन्न वाया जाते. मात्र, ‘फुड दोस्ती’ अॅपच्या माध्यमातून तुम्हाला फुल प्लेट अन्न ऑर्डर करून त्यातील हाफ प्लेट अन्न हॉटेल मालकाकडे जमा ठेवता येणार आहे. हॉटेल मालकाकडे जमा असलेले अन्न आपण हॉटेलमध्ये पुन्हा कधीही जाऊन खाऊ शकता. त्यामुळे हॉटेलमध्ये ग्राहकांचे अन्न फेकले जात नाही. तसेच, हॉटेल-रेस्टॉरंट चालकाकडे अतिरिक्त शिल्लक असलेले अन्न काही संस्थांना देऊन गरजूंपर्यंत अन्नदान करण्याची सुविधादेखील या अॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे अन्नाची नासाडी होणार नाही आणि अन्नाचा सदुपयोग होईल, अशा पद्धतींने हे अॅप संजीव नेवे यांनी तयार केले आहे.

या अॅपचे फिचर्स खूप छान असल्याने लोकांचा या अॅपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुण्यातील जवळपास १५० हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी या अॅपच्या माध्यमातून सेवा द्यायला सुरुवात केली आहे. टेक्नो सेवी तरुणांच्या युगात या अॅपचा वापर वाढल्याने देशात अन्न नासाडीला आळा घालण्यास आपल्याला काही प्रमाणात का होईना निश्चितच मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *